What's New

Department and Planning

श्री. निलेश मोर , BRC जव्हार ( बालरक्षक तालुका समन्वयक ) शिक्षण ही निरंतर चालणारी प्रकीया आहे . या शिक्षण प्रक्रीयेत समाजातील शाळेच्या प्रवाहाबाहेर असलेल्या दुर्बल , वंचित व मागासलेले घटक यांच्या बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक मनापासून प्रयत्न करत आहे . याचे फलित म्हणजे आतापर्यंत E१-६५ , E2 =५६९ मुले दाखल झाली . तर जिल्ह्यातील २२४० शाळाबाह्य असणाऱ्या मुलांचे स्थलांतर रोखले गेले . यामुळे दिवसें दिवस बालरक्षक चळवळ अधिक व्यापक होत आहे . या चळवळीत बहूमोल योगदान देणाऱ्या बालरक्षक शिक्षकांचा तसेच आपल्या शाळांमध्ये नवनवीन गुणवत्तावाढी साठी उपक्रम राबवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्वकांक्षी उपक्रमाला पुढे नेणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम पाच क्रमांक आलेल्या नवोपक्रम स्पर्धेतील शिक्षकांचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता तसेच यामध्ये तालुका स्तरावरील २ शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आलेला आहे. या मध्ये आपण उत्कृष्ट काम केल्या बददल आपले हार्दिक अभिनंदन

What's New