विभागाचे नाव | ग्रामपंचायत विभाग | |
खाते प्रमुखाचे पदनाम | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) | |
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | 02525 – 250800 | |
विभागाचा ईमेल | vpzppalghar@gmail.com |
ग्रामपंचायतींना जन सुविधा योजने अंतर्गत विशेष अनुदान
योजनेचे स्वरुप माहिती
जन सुविधा योजने अंतर्गत
(अ) ग्रामिण भागात दहन/ दफन भुमीची व्यवस्था करणे त्या सुस्थितीत ठेवणे व त्यांचे नियमन करणे यासाठी स्मशानभुमीवर हाती घ्यावयाची कामे दहन/दफन भुमी भुसंपादन,चबुत-यांचे बांधकाम,पोहोच रस्ता,गरजे नुसार कुंपन व भिती घालणे, विद्युतीकरण, आवश्यकते नुसार विद्युत दाहिनी, पाण्याची सोय, स्मृती उद्यान, स्मशान घाट जमिन सपाटीकरण व तळफरशी
(ब) ग्रामपंचायत भवन/ कार्यालय बांधकामे. यात ज्या गावांमध्ये ग्रा.प.इमारत नाही अश्या ठिकाणी सदर योजने अंतर्गत नवीन इमारत बांधकाम प्राधान्याने हाती घेण्यात यावे. या शिवाय जुन्या पडझड झालेल्या ग्रा.प. इमारतीची पुर्नरबांधणी अथवा विस्तार करणे, इमारती भोवती कुपंण घालणे, आवारामध्ये वृक्षारोपण करणे परिसर सुधारणा करणे
योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
१) या योजने अंतर्गत प्रत्येक कामास प्रशासकिय मान्यता ग्रामसभेच्या सहमती नंतर ग्रा.प. मार्फत घेण्यात यावी.
२) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.
३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
५) सदर योजने अंतर्गत कामांची निवड जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येईल.
६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा
७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र
८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
९) गट विकास अधिकारी यांचे शिफारशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जिल्हा परिषद पालघर कडे सादर करण्यात यावा.
योजनेचे स्वरुप माहिती
मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत बाजारपेठ विकास, सार्वजनिक दिबाबत्तीची सोय, बागबगीचे, उद्याने तयार करणे, अभ्यासकेंद्र, गांवअंतर्गत रस्ते करणे व सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुमीगत नाल्याचे बांधकाम करणे.
योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
१) या योजने अंतर्गत ग्रा.प. ने आराखडा तयार करुन त्यास ग्रामसभेची प्रशासकिय मान्यता घ्यावी. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांची प्रस्तावास मान्यता घेण्यात यावी.
२) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.
३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
५) जिल्हयातील ग्रा.प.चा प्राधान्य क्रम ठरविण्याचा अधिकार जिल्हा नियोजन मंडळाकडे असेल ज्या ग्रा.प.ची लोकसंख्या ५००० च्या वर आहेत व ज्या ग्रामपंचायती पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेत सहभागी होवुन त्या योजनेच्या निकषाची पुर्तता केली असेल त्यामधुनच जिल्हा नियोजन मंडळ प्राधान्यक्रम ठरविल.
६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा
७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र
८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
९) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जिल्हा परिषद पालघर कडे सादर करण्यात यावा.
मा.लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामिण भागातील गावांतर्गत रस्ते गटारे व अन्य मुलभुत सुविधा पुरविणे
योजनेचे स्वरुप माहिती
मुलभुत सुविधा योजने अंतर्गत गावांतर्गत रस्ते, गटारे, पाऊसपाणी निचरा, दहनभुमी व दफनभुमीची सुधारणा करणे, संरक्षकभिंत ,ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, आठवडी बाजारासाठी सुविधा, गावांमध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा, सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण करणे.
योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
१) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.
२) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
३) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
४) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा
५) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्याबाबत दाखला प्रमाणपत्र
६) सदर योजने अंतर्गत काम सुचविणे बाबत लोक प्रतिनिधी यांचे शिफारस पत्र
७) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
८) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जिल्हा परिषद पालघर कडे सादर करण्यात यावा.
१.पालघर जिल्हयात ८ तालुके असनु २ तालुके वसई व पालघर हे अंशत: पेसा क्षेत्रात येतात व ६ तालुके डहाणु, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे पुर्ण पेसा क्षेत्रात येतात.
पेसा अंतर्गत ५% अबंध निधी सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षातसन २०११ च्या जनगणने नुसार दरडोई ४०६ रुपये पैकी ७०% नुसार २८४.८४ दरडोई ग्रामपंचातींना शासना मार्फत थेट वितरीत करणेत आला आहे.
सन २०१६-१७ ST Population च्या ६०१ प्रमाणे देय रक्कम आहे.
पेसा निधी हा शासन निर्णय २१ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार खर्च करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. व त्या प्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर तो खर्च करण्यात येत आहे.
सदर र्ख्च हा खालील प्रमाणे करण्यात याव्यात अशा सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत
अ) पायाभूत सूविधा:
१.संबधित पेसा गावातील ग्रामपंचायत कार्यालये , आरोग्य केंद्रे,अंगणवाडी, शाळा,
दफनभूमी ,गोडावून, गावांचे अंतर्गत रस्ते व तत्सम पायाभूत सूविधा
ब) वनहक्क अधिनियम(FRA) व पेसा (PESA)अंमलबजावणी:
१.आदिवासींनी त्यांच्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायाच्या संदर्भात प्रशिक्षण केंद्रांमार्फत
प्रशिक्षण /मार्गदर्शन करणे.
२. गावतळी विकास किंवा मत्स्यपालन व्यवसाय/ मत्स्यबीज खरेदी.
३.सामाईक जमिनी विकसित करणे.
४.गौण पाणी साठयाचे व्यवस्थापन.
५.सामाईक नैसर्गिक साधनसंपदा व सामाईक मालमत्ता विकसित करणे.
क) आरोग्य , स्वच्छता ,शिक्षण.:
१. सार्वजनिक स्वच्छतागृहे,बांधणे.
२.गावांमध्ये स्वच्छता राखणे.
३.सांडपाणी व्यवस्थेकरीता गटारे बांधणे व त्यांची देखभाल करणे.
४.शुध्द पिण्याचे पाणी पुरविणे.
ड) वनीकरण , वन्यजीवसंवर्धन,जलसंधारण,वनतळी,वन्यजीव पर्यटन व वन उपजिविका:
ग्रामसभांनी कामाची निवड करणे म्हणजेच त्या कामास ग्रामसभेची प्रशासकिय मान्यता समजावी. ग्रामसभेने निवड केलेल्या रु.३ लक्ष पेक्षा कमी मुल्याच्या कामास स्वतंत्र तांत्रिक मान्यता आवश्यक असणार नाही व रु.३ लक्ष पेक्षा अधिक मुल्य असलेल्या कामासाठी तांत्रिक मान्यता घेण्याची पध्दती परिच्छेद-४(६) प्रमाणे राहील.
*तसेच पेसा ५ % निधी ब व ड वरील खर्च करणे संदर्भात आदिवासी विभागाकडील दिनांक 20/02/2016 शासन निर्णया नुसार शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
वन हक्क मान्यता अधिनियम 2005 च्या नियम 2008च्या नियम 4(1)(e) नुसार समिती स्थापन पालघर जिल्हयात ७४८ गावांसाठी समित्या स्थपण करण्यात आलेल्या आहेत.
मानव विकास कार्यक्रम-
मानव विकास कार्यक्रम हा पालघर जिल्हयातील पंचायत समिती. डहाणु, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा. या तालुक्यामध्ये राबविण्यात येतो
१. शासन नियोजन विभागाचा शासन निर्णय क्रं. माविका-२०१४/प्र.क्र. १२ का.१४१ दि- २१/०८/२०१४. नुसार मानव विकास संदर्भात मा. आयुक्त मानव विकास, औरंगाबाद यांच्या मार्पत गौण वनोपज उत्पादन करणे संदर्भात निधी वितरीत करण्यात येतो हा निधी खालील प्रमाणे वितरीत केला जातो.प्रपत्र-१ मध्ये- तेंदुपत्ता व बांबु व्यतीरीक्त (डींक, पळस पाने , गोळा करणे मासेमारी, ) साठी प्रस्ताव सादर करण्यात येतात.
प्रपत्र २ मध्ये तेंदुपत्ता व बांबु करीता प्रस्ताव सादर करण्यात येतात.
अ.क्र | बाब | अनज्ञेय रक्कम |
१. | ५०० पेक्षा कमी लोकसंख्या पंरतु तेंदु पत्ता व बांबु व्यतरीक्त गौण वनोपज तसेच लघु पाणी साठयातील मासेमारी व्यवसायासाठी | २ लक्ष |
२ | ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या पंरतु तेंदु पत्ता व बांबु व्यतरीक्त गौण वनोपज तसेच लघु पाणी साठयातील मासेमारी व्यवसायासाठी | ४ लक्ष |
३ | ५०० पेक्षा कमी लोकसंख्या पंरतु तेंदु पत्ता व बांबु गौण वनोपज उत्पन्न तसेच लघु पाणी साठयातील मासेमारी व्यवसायासाठी | ४ लक्ष |
४ | ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या पंरतु तेंदु पत्ता व बांबु गौण वनोपज उत्पन्न तसेच लघु पाणी साठयातील मासेमारी व्यवसायासाठी | ८लक्ष |