बंद

    परिचय

    पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्यातील काही तालुके वेगळे करून दि. १ ऑगस्ट २०१४ ला ‘पालघर’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. सागरी, डोंगरी व ग्रामीण अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना पालघर जिल्ह्याला लाभली आहे. या जिल्ह्यात सागरी किनारा लाभलेला डहाणू, पालघर, वसई हे तालुके तसेच औद्योगिक दृष्ट्या विकसित असा वाडा व पालघर तालुका तसेच अतिदुर्गम डोंगरी भाग असलेला जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी हे तालुके असे एकूण आठ तालुके आहेत. या जिल्ह्याला ७० कि.मी. चा अरबी समुद्र किनारा लाभला असून वैतरणा, उल्हास, देहेरजा, पिंजाळ, सूर्या व तानसा या प्रमुख नद्या वाहतात. येथील हवामान उष्ण व दमट असून पर्जन्यमान सरासरी २००० ते ३५०० मि.मि. एवढे आहे. त्यामुळे येथे तानसा व सूर्या या धरणाचा लाभ घेता येतो.

    जिल्ह्यात ८ तालुके असून ८ पंचायत समित्या ४७३ ग्रामपंचायती व ४१५ पेसा ग्रामपंचायती आहेत. देशातील वीज निर्मिती करणारा पहिला अणुउर्जा प्रकल्प पालघर जिल्हयातील पालघर तालुक्यात तारापूर येथे आहे. अर्नाळा, केळवा, डहाणू (सागरी), वसईचा भुईकोट किल्ला, जव्हारचा राजवाडा इ. ऐतिहासिक किल्ले पालघर जिल्ह्यात आहेत. पालघर तालुक्यातील शितलादेवी मंदिर, डहाणू तालुक्यातील श्रीमहालक्ष्मी माता मंदिर, आशागड येथील श्रीसंतोषी माता मंदिर, नरपडचे साईबाबा मंदिर, सावटा येथिल शिवमंदिर, वसई तालुक्यातील जीवदानी माता मंदिर, वाडा येथिल तीळशेश्वर मंदिर अशी देवस्थाने जिल्ह्याला लाभली आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात दाभोसा धबधबा, छोटे महाबळेश्वर (सन सेट पोईंट), पालघर तालुक्यातील वाघोबा खिंडीतील धबधबा, सातीवली कुंड असे निसर्गरम्य ठिकाण लाभलेले आहे.

    पालघर जिल्हा सर्वसाधारण माहिती
    विभाग माहिती
    पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र :- ४,६९,६९९ हेक्टर
    पालघर जिल्ह्यास लाभलेला समुद्र किनारा :- ११२ कि.मी.
    मासेमारी अनुकुल क्षेत्र :- ११,३२८ हेक्टर
    एकुण तालुके :-
    एकुण आदिवासी पंचायत समित्या :-
    अंशत: आदिवासी पंचायत समित्या :-
    एकुण महसुल गावाची संख्या :- १,००७
    एकुण लोकसंख्या ( २०११ जनगणना) :- २९९५४२८
    अ.ज. लोकसंख्या :- १०,०५,२७२
    जिल्हा परिषद गट :- ५७
    पंचायत समिती गण :- ११४
    जिल्हा परिषद सर्वसाधारण समिती :-
    जिल्हा परिषद विषय समिती :- १०
    पंचायत समिती संख्या :-
    ग्रामपंचायत :- ४७३
    पैकी पेसा ग्रामपंचायत :- ४११
    पशुवैदयकीय दवाखाने :- ८५
    पैकी श्रेणी 1 :- ४१
    श्रेणी 2 :- ४४
    प्राथमिक आरोग्य केंद्र :- ४६
    उपकेंद्र :- ३०४
    प्राथमिक शाळा :- २१९७
    माध्यमिक शाळा :- ५६९
    भौगोलिक स्थिती (तालुके)
    आदिवासी तालुके :- जव्हार,मोखाडा,विक्रमगड,तलासरी,वाडा,डहाणू
    अतिदुर्गम डोंगरी तालुके :- जव्हार,मोखाडा,विक्रमगड,तलासरी,वाडा
    सागरी तालुके :- डहाणु,वसई,पालघर.
    हवामान :- उष्ण व दमट
    पर्जन्यमान :- सरासरी 2500 ते 3500 मि.मी.
    नदी व खोरे. :- देहर्जे, सुर्या, पिंजाळ, तानसा, वैतरणा .
    धरणे :- देहर्जे, कवडास, धामणी, वांद्री.
    जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे
    थंड हवेचे ठिकाण :- जव्हार, खोडाळा,सुर्यामाळ.
    पर्यटण स्थळे :- अर्नाळा किल्ला, जव्हार राजवाडा, दाभोसा धबधबा. केळवा माहिम बोर्डी बिच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्तपर्शाने पावण झालेले शिरपामाळ जव्हार
    मंदीर/ देवस्थान :- महालक्ष्मी( डहाणू),शितलादेवी, महादेव मंदिर सातिवली गरम पाण्याचे झरे
    इस्कॉन गालतरे (हरेकृष्ण)
    कला :- तारपा वादय व नृत्य दोन्हा प्रसिध्द आहेत
    शेती विषयक प्रसिध्द बाबी वाडा कोलम तांदुळ प्रसिध्द, डहाणु घोलवड चिकु प्रसिध्द, बहाडोलीचे जांभुळ, पालघरची वेलची केळी तसेच वसई सुकेळी प्रसिध्द आहेत.
    गड किल्ले वसई चा अर्नाळा किल्ला, केळवे चा समुद्रात असलेला किल्ला, गंभीर गड, तारापुरचा किल्ला, काळदुर्ग, कमाणदुर्ग,शिरगाव किल्ला
    उर्जा क्रेद्र तारापुर अणु उर्जा प्रकल्प तारापुर, औष्णिक प्रकल्प अदानी पावर डहाणु.

    आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.

    बलवंतराय मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अशा प्रकारे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले. जिल्हा परिषद (सामान्यतः जि. प. म्हणून ओळखले जाते.) हि भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हे जिल्हा मुख्यालय येथे असते.

    महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा परिषद करते.

    जि.प. पालघर अंतर्गत विविध विषय समित्या खालील प्रमाणे

    1. स्थायी समिती
    2. जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती
    3. महिला व बालकल्याण समिती
    4. समाज कल्याण समिती
    5. कृषी समिती
    6. पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती
    7. शिक्षण व क्रिडा समिती
    8. आरोग्य समिती
    9. बांधकाम समिती
    10. अर्थ समिती