व्हिजन आणि मिशन
कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी सबंधित विषयांची संचिका खालीलप्रमाणे सादर करतात.
आस्थापना विषयक बाबी – विभागीय अधिकारी मार्फत, वरिष्ठ आणि ज्यु. अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी (आस्थापना) अंतिम निर्णय / मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर केले जातात.
लेखा विषयक बाबी – कनिष्ठ लेखाधिकारी, अधिक्षक राजपत्रित, लेखाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत अंतिम निर्णय व मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर केले जातात.
शिक्षण विभागातील विविध पदे – अधीक्षक, वरिष्ठ आणि कनिष्ठ सहाय्य, कनिष्ठ लेखाधिकारी, अधीक्षक (राजपत्रित), उपशिक्षणाधिकारी.
तालुका स्तरावरून माहिती/अहवाल प्राप्त करणे व सादर करणे आणि या कामांवर देखरेख करणे आणि त्यांच्या ताब्यातील नोंदी अद्ययावत ठेवणे ही संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.