प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना.
सदर योजना आदिवासी विकास प्रकल्प यांचेमार्फत कार्यान्वीत करणेत आली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद पालघर यांचे मार्फत करण्यात येते. सदर योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता आदेश झाल्यानंतर यंत्रणेला एकूण 100 टक्के रक्कम वर्ग करण्यात येते. कामाच्या प्रगतीनुसार कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदारास मागणीनुसार 60 टक्के रक्कम RA BILL म्हणून खर्च करता येईल. 40 टक्के आदिवासी विकास विभाग कार्यालयाचे आदिवासी विकास निरीक्षक व सहाय्यक प्रकल्प आधिकारी यांच्या संयुक्त भेट अहवालानुसार अदा करणेत येईल. सदर योजनेअंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र व काम पूर्णत्वाचा दाखला अंमलबजावणी यंत्रणेने प्रकल्प कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.
लाभार्थी:
स्थानिक रहिवासी.
फायदे:
स्थानिकांना रोजगार व दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे.
अर्ज कसा करावा
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार / डहाणू मार्फत.