जिल्ह्या विषयी

जिल्हा परिषद सर्वसाधारण माहिती

जिल्हा परिषद सर्वसाधारण माहिती

            पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्यातील काही तालुके वेगळे करून दि. १ ऑगस्ट २०१४ ला ‘पालघर’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. सागरी, डोंगरी व ग्रामीण अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना पालघर जिल्ह्याला लाभली आहे. या जिल्ह्यात सागरी किनारा लाभलेला डहाणू, पालघर, वसई हे तालुके तसेच औद्योगिक दृष्ट्या विकसित असा वाडा व पालघर तालुका तसेच अतिदुर्गम डोंगरी भाग असलेला जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी हे तालुके असे एकूण आठ तालुके आहेत. या जिल्ह्याला ७० कि.मी. चा अरबी समुद्र किनारा लाभला असून वैतरणा, उल्हास, देहेरजा, पिंजाळ, सूर्या व तानसा या प्रमुख नद्या वाहतात. येथील हवामान उष्ण व दमट असून पर्जन्यमान सरासरी २००० ते ३५०० मि.मि. एवढे आहे. त्यामुळे येथे तानसा व सूर्या या धरणाचा लाभ घेता येतो.

              जिल्ह्यात ८ तालुके असून ८ पंचायत समित्या ४७३ ग्रामपंचायती व ४१५ पेसा ग्रामपंचायती आहेत. देशातील वीज निर्मिती करणारा पहिला अणुउर्जा प्रकल्प पालघर जिल्हयातील पालघर तालुक्यात तारापूर येथे आहे. अर्नाळा, केळवा, डहाणू (सागरी), वसईचा भुईकोट किल्ला, जव्हारचा राजवाडा इ. ऐतिहासिक किल्ले पालघर जिल्ह्यात आहेत. पालघर तालुक्यातील शितलादेवी मंदिर, डहाणू तालुक्यातील श्रीमहालक्ष्मी माता मंदिर, आशागड येथील श्रीसंतोषी माता मंदिर, नरपडचे साईबाबा मंदिर, सावटा येथिल शिवमंदिर, वसई तालुक्यातील जीवदानी माता मंदिर, वाडा येथिल तीळशेश्वर मंदिर अशी देवस्थाने जिल्ह्याला लाभली आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात दाभोसा धबधबा, छोटे महाबळेश्वर (सन सेट पोईंट), पालघर तालुक्यातील वाघोबा खिंडीतील धबधबा, सातीवली कुंड असे निसर्गरम्य ठिकाण लाभलेले आहे.

 

पालघर जिल्हा सर्वसाधारण माहिती

पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र :-

,६९,६९९ हेक्टर

पालघर जिल्ह्यास लाभलेला समुद्र किनारा :-

११२ कि.मी.

मासेमारी अनुकुल क्षेत्र :-

११,३२८ हेक्टर

एकुण तालुके :-

एकुण आदिवासी पंचायत समित्या :-

अंशत: आदिवासी पंचायत समित्या :-

एकुण महसुल गावाची संख्या :-

,००७

एकुण लोकसंख्या ( २०११ जनगणना) :-

२९९५४२८

अ.ज. लोकसंख्या :-

१०,०५,२७२

जिल्हा परिषद गट :-

५७

पंचायत समिती गण :-

११४

जिल्हा परिषद सर्वसाधारण समिती :-

जिल्हा परिषद विषय समिती :-

१०

पंचायत समिती संख्या :-

ग्रामपंचायत :-

४७३

पैकी पेसा ग्रामपंचायत :-

४११

पशुवैदयकीय दवाखाने :-

८५

पैकी श्रेणी 1 :-

४१

श्रेणी 2 :-

४४

प्राथमिक आरोग्य केंद्र :-

४६

उपकेंद्र :-

३०४

प्राथमिक शाळा :-

२१९७

माध्यमिक शाळा :-

५६९

भौगोलिक स्थिती (तालुके)

 

आदिवासी तालुके :-

जव्हार,मोखाडा,विक्रमगड,तलासरी,वाडा,डहाणू

अतिदुर्गम डोंगरी तालुके :-

जव्हार,मोखाडा,विक्रमगड,तलासरी,वाडा

सागरी तालुके :-

डहाणु,वसई,पालघर.

हवामान :-

उष्ण व दमट

पर्जन्यमान :-

सरासरी 2500 ते 3500 मि.मी.

नदी व खोरे. :-

देहर्जे, सुर्या, पिंजाळ, तानसा, वैतरणा .

धरणे :-

देहर्जे, कवडास, धामणी, वांद्री.

जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे

 

थंड हवेचे ठिकाण :-

जव्हार, खोडाळा,सुर्यामाळ.

पर्यटण स्थळे :-

अर्नाळा किल्ला, जव्हार राजवाडा, दाभोसा धबधबा. केळवा माहिम बोर्डी बिच

मंदीर/ देवस्थान :-

महालक्ष्मी( डहाणू),शितलादेवी

आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.

          बलवंतराय मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अशा प्रकारे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले. जिल्हा परिषद (सामान्यतः जि. प. म्हणून ओळखले जाते.) हि भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हे जिल्हा मुख्यालय येथे असते.

       महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा परिषद करते.

 

जिल्हा परिषदेचे मुलभूत कार्य:

ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणे.

शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून देणे. तसेच शेतीसाठी उपयुक्त सुधारित आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे.

ग्रामीण भागात शाळा व ग्रंथालये स्थापन करून ती व्यवस्थितपणे चालविणे.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये सुरू करणे. तसेच वेळोवेळी साथींचे रोग निवारणासाठी प्रतिबंधक लसींचा कार्यक्रम राबविणे.

ग्रामीण भागात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी विकास योजनांची अंमलबजावणी करणे. आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा  चालविणे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह स्थापन करणे.

ग्रामीण रोजगार राबविणेसाठी लघुउद्योग सुरु करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे.

ग्रामीण भागात पूल, रस्ते बांधणे व त्यांची देखभाल करणे तसेच इतर सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे.

रोजगारनिर्मिती करणे.

जिल्हा परिषद, पालघर - एक दृष्टीक्षेप

जिल्हा परिषद, पालघर ची स्थापना सन १ ऑगस्ट २०१४ ला झाली  

जि.प. पालघर अंतर्गत विविध विषय समित्या खालील प्रमाणे

स्थायी समिती

जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती

महिला व बालकल्याण समिती

समाज कल्याण समिती

कृषी समिती

पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती

शिक्षण व क्रिडा समिती

आरोग्य समिती

बांधकाम समिती

अर्थ समिती

पालघर जिल्हा परिषदेची संरचना

Palghar Map

निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य : ५७

सर्व पंचायत समित्यांचे एकूण सदस्य : ११४

एकूण पंचायत समिती : ०८

 

अ. क्र.

तालुका

जि. प. सदस्य संख्या

पं. स. सदस्य संख्या

ग्रा. पं. ची संख्या

महसुली गावे

पेसा ग्रा. पं. ची संख्या

पेसा महसुली गावे

पेसा क्षेत्रात पाडे/वाड्या , वस्त्याची संख्या

अनुसूचित क्षेत्र

वसई

4

8

31

49

19

32

71

आंशिक

पालघर

17

34

133

215

87

149

603

आंशिक

डहाणु

13

26

85

174

85

174

960

पूर्ण भाग

तलासरी

5

10

21

41

21

41

214

पूर्ण भाग

वाडा

6

12

84

168

84

168

421

पूर्ण भाग

विक्रमगड

5

10

42

93

42

93

463

पूर्ण भाग

जव्हार

4

8

50

109

50

109

261

पूर्ण भाग

मोखाडा

3

6

27

56

27

56

157

पूर्ण भाग

 

एकूण

57

114

473

905

415

822

3150