जिल्हा परिषद पालघर येथे संविधान दिन साजरा
आज दिनांक २६/११/२०२४ रोजी जिल्हा परिषद पालघर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला व बालविकास प्रवीण भावसार, शिक्षणाधिकारी माध्यमिक संगीता भागवत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेमधील संविधान स्तंभाजवळ संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर यांनी उद्देशिकेचे वाचन केले. भारतीय_संविधान_दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता.भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबर ला तयार झाली असल्याने २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. तसेच यावेळी २६/११/२००८ रोजी मुंबई मधे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.