बंद

    अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे

    • तारीख : 06/01/2025 -

    राज्य शासनस्तरावरील सदर योजने अंतर्गत अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये रस्ते, लाईट, पाणी इ. सोयी सुविधा पुरविणे तसेच सदर वस्तींमध्ये समाजमंदीर बांधून दिले जाते.

    शासन निर्णय, दिनांक 5 डिसेंबर 2011 तसेच 6 ऑक्टोंबर 2021 अन्वये लोकसंखेच्या निकषानुसार प्रत्येक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीला लोकसंखेच्या प्रमाणात खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते.

    अ. क्र. लोकसंख्या अनुदान (रु.)
    1 10 ते 25 4 लक्ष
    2 26 ते 50 10 लक्ष
    3 51 ते  100 16 लक्ष
    4 101 ते 150 24 लक्ष
    5 151 ते 300 30 लक्ष
    6 301 च्या पुढे 40 लक्ष

    लाभार्थी:

    शासन निर्णय, दिनांक 5 डिसेंबर 2011 तसेच 6 ऑक्टोंबर 2021 अन्वये लोकसंखेच्या निकषानुसार प्रत्येक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीला लोकसंखेच्या प्रमाणात खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते.

    फायदे:

    अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.

    अर्ज कसा करावा

    संबंधित ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी पालघर यांना आवश्यक कामाबाबत प्रस्ताव सादर करावा.