बंद

    अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य

    • तारीख : 06/01/2025 -

    अपंग व अव्यंग असलेल्या व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देणे व विवाहासाठी आर्थिक सहाय्य करणे.

    लाभार्थी:

    किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधु किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराने अपंगत्व असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास या योजनेतून लाभ दिला जातो.

    फायदे:

    लाभाची रक्कम रुपये रु. 50,000/-

    अर्ज कसा करावा

    जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद पालघर यास अर्ज करावा.
    1. किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह केलेल्या जोडप्यास योजना.
    2. अपंग वधु वा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
    3. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
    4. विवाह झाल्यापासून एक वर्षाच्या आत प्रस्ताव सादर करणे आवश्यक.
    5. लाभाची रक्कम रु. 50,000/-