आंतरजातीय विवाहीतांना प्रोत्साहनपर अनुदान देणे
या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील जातीय भेदभाव दुर करून एकात्मिकतेची भावना रूजविणे. या करीताच केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्याला राज्य शासन – 25000 व केंद्र शासन- 25000 असे एकुण 50000 प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
लाभार्थी:
विवाह करणाऱ्यापैकी एक अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केलेले जोडपे पात्र.
फायदे:
लाभाची रक्कम रुपये रु. 50,000/-
अर्ज कसा करावा
पंचायत समिती मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. , समाज कल्याण विभागास अर्ज करावा.
अर्ज स्वच्छ अक्षरात भरून अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या प्रती क्रमाने जोडाव्यात.
1. विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर वर व वधु यांचा एकत्रित फोटो चिकटवावा.(लहान आकाराचा)
2. सक्षम अधिकाऱ्याकडील विवाह नोंदणी धाकला/
3. वर व वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले.
4. वर अथवा वधु मागासवर्गीय असल्यास उप विभागीय दंडाधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला.
5. अर्जदार इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) असल्यास जातीचा दाखला देणे आवश्यक आहे.
6. वर व वधु यांचा मा. जिल्हाधिकारी/तहसीलदार यांनी दिलेला 15 वर्ष वास्तव्याचा दाखला (डोमेसाईल)
7. इतर माहिती मधील अनु.क्र.9 मध्ये नमुद केलेनुसार स्टंप पेपरवर सत्य प्रतिज्ञापत्र (मुळ प्रत) जोडावे.
8. वर व वधु यांचे प्रत्येकी दोन प्रतिष्टीत व्यक्तींची अर्थसहाय्य मिळणे करीताचे शिफारस पत्र (मुळ प्रत) जोडावी.
9. रेशन कार्ड छायांकित प्रत (वर व वधु च्या नावाची नोंद असणे आवश्यक आहे)
10. वर व वधु यांच्या एकत्रित बँक खाते पासबुकची छायांकित प्रत (राष्ट्रीयकृत बँक असणे आवश्यक आहे.)