मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक संगणक प्रशिक्षण देणे
जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 20% अंतर्गत योजना
सदर योजने अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते.
लाभार्थी:
लाभार्थी हा मागासवर्गीय असावा. (अनु.जाती/जमाती/विजाअ/भज/विमाप्र).
फायदे:
लाभाची रक्कम रुपये 4,500/-
अर्ज कसा करावा
पंचायत समिती मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. , समाज कल्याण विभागास अर्ज करावा.
1. लाभार्थी हा मागासवर्गीय असावा. (अनु.जाती/जमाती/विजाअ/भज/विमाप्र), जातीचा दाखला असावा.
2. लाभार्थीने चालू वर्षात प्रशिक्षण (MS-CIT) पुर्ण करणे आवश्यक राहील.
3. दारिद्रय रेषेखालील किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.1,00,000/-
4. ग्रामसभेचा निवडीचा ठराव
5. अंतीम निवड समाजकल्याण समिती मार्फत.
6. लाभाची रक्कम रु. 4,500/-