राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस)
योजना प्रारंभ :- 2007-08
राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच खाजगी अनुदानित शाळेतील इ. 8 वी ला शिकणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिीनी. (आधी सदर परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते).
लाभार्थी:
इ. 9 वी ते इ. 12 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरीता असलेली योजना.
फायदे:
इ. 9 वी साठी वार्षिक शिष्यवृत्ती – 12000/- रु. त्याचप्रमाणे, इ. 10 वी, इ. 11 वी तसेच 12 वी साठी वार्षिक प्रत्येकी 12000/- रु. दिले जातात. असे एकूण 48000/- रु. एकूण 4 वर्षांसाठी दिले जातात.
अर्ज कसा करावा
योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येते.