आरोग्य केंद्र / उपकेंद्र यांचे बांधकाम, विस्तारीकरण व दुरुस्ती करणे.
आरोग्य विभागाकडून सदर योजनेचा आवश्यक कामांचा आराखडा तयार करुन बांधकाम विभागाला सादर करणेत येतो. आराखडयातील कामांची प्रत्याक्ष पहाणी करुन निधीच्या उपलब्धतेनुसार अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणेत येतात. प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामे पूर्ण करुन घेतली जातात.
लाभार्थी:
स्थानिक रहिवासी.
फायदे:
स्थानिकांना रोजगार व आरोग्य संबंधीत सुविधा उपलब्ध करुन देणे.
अर्ज कसा करावा
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचे मार्फत.