ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम राबविणे.
महाराष्ट्र शासन, आदिवासी विभागाकडील निर्णयानूसार रस्ते सुधारणा, रस्ते काँक्रीटीकरण, समाजमंदीर, इमारतीस कूंपन बांधणे, स्मशानशेड इ.कामे या योजनेतून करण्यात येतात. गाव निहाय आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून निधी प्राप्त होतो. प्रकल्प कार्यालयाने तयार केलेल्या आराखडयानुसार अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेकरीता सादर करण्यात येतात.
लाभार्थी:
स्थानिक आदिवासी बांधव.
फायदे:
स्थानिकांना रोजगार व दळण वळणाची सुविधा उपलब्ध करुन देणे.
अर्ज कसा करावा
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार / डहाणू मार्फत.