दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना.
लाभार्थी:
शासनमान्यता प्राप्त सर्व अनुदानित शाळेतील इ. 9 वी व इ. 10 वी मधील दिव्यांग विद्यार्थी पण, अट अशी आहे की, सदर विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण हे 40% पेक्षा जास्त असावे.
फायदे:
दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार शासनाकडून वार्षिक 2000/- रु. ते 4000/- रु. अशी मदत शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते.
अर्ज कसा करावा
योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येते.