बंद

    मागासवर्गीयांना नवीन घर बांधणीसाठी अगर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य

    • तारीख : 06/01/2025 -

    जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 20% अंतर्गत योजना

    मागासवर्गीय व्यक्तींना नवीन घरबांधणीसाठी किंवा त्यांच्या जुन्या घराच्या दुरूस्तीकरीता बांधकाम अभियंत्याकडील अंदाजपत्रकानुसार अर्थसहाय्य दिले जाते.

    लाभार्थी:

    लाभार्थी हा मागासवर्गीय असावा. (अनु.जाती/जमाती/विजाअ/भज/विमाप्र)

    फायदे:

    लाभाची रक्कम रुपये 50,000/-

    अर्ज कसा करावा

    पंचायत समिती मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. , समाज कल्याण विभागास अर्ज करावा.
    1. लाभार्थी हा मागासवर्गीय असावा. (अनु.जाती/जमाती/विजाअ/भज/विमाप्र), जातीचा दाखला असावा.
    2. दारिद्रय रेषेखालील किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.1,00,000/-
    3. गाव नमुना क्र.8 आवश्यक
    4. ग्रामसभेचा निवडीचा ठराव
    5. अंतीम निवड समाजकल्याण समिती मार्फत.
    6. लाभाची रक्कम रु. 50,000/-