लाभार्थ्यांना लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य (शिलाई मशीन/मसाला कांडप मशिन पुरविणे)
जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 20% अंतर्गत योजना
सदर योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणेकरीता लघुउद्योगासाठी शिलाई मशिन/मसाला कांडप मशिन वाटप करणे.
लाभार्थी:
लाभार्थी हा मागासवर्गीय असावा. (अनु.जाती/जमाती/विजाअ/भज/विमाप्र)
फायदे:
महिलांना स्वयंरोजगाराची संधी.
अर्ज कसा करावा
पंचायत समिती मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. , समाज कल्याण विभागास अर्ज करावा.
1. लाभार्थी हा मागासवर्गीय असावा. (अनु.जाती/जमाती/विजाअ/भज/विमाप्र), जातीचा दाखला असावा.
2. लाभार्थीने शासकीय मान्यता प्राप्त संस्थे मधून प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत प्रमाणपत्र.
3. दारिद्रय रेषेखालील किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.1,00,000/-
4. ग्रामसभेचा निवडीचा ठराव
5. अंतीम निवड समाजकल्याण समिती मार्फत.