अधिकारी व कर्मचारी यांचे कडून श्रमदानातून जिल्हा परिषद आवारात स्वच्छता अभियान
कृषी विभागामार्फत १ जुलै २०२४ रोजी ५०० झाडे लावण्याचा व संगोपन करण्याचा निर्धार जिल्हास्तरीय प्रशासनाने घेतला आहे. ५०० झाडे लावणे संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर श्री.भानुदास पालवे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सुचित केले व जिल्हा परिषद आवारात स्वतः उपस्थित राहून स्वच्छता अभियान राबविले
महाराष्ट्र कृषी दिन १ जुलै रोजी साजरा केला जातो. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणूनही ओळखला जातो. कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पालघर आवरात ५०० झाडे लावण्यासाठी खड्डे करण्यात आले. यासाठी समन्वय म्हणून कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास श्री.प्रवीण भावसार यांनी वन विभागाकडून विविध प्रकारचे ५०० झाडे उपलब्ध करून घेतले आहेत.
झाडे लावण्यापूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), चंद्रशेखर जगताप,मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री धनराज पांडे तसेच उप अभियंता श्री संजय कुलकर्णी यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषद पालघर यांनी स्वच्छता अभियान राबवले. परिसरामध्ये झाडे लावण्या योग्य ठिकाण करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवले.
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्हा परिषदेच्या समोरील जागेत झाडे लावून संगोपन करण्याच्या सूचना सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या व स्वच्छता अभियानामध्ये सहभागी घेऊन परिसर स्वच्छ केला यामध्ये मुख्यत्व करून चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सहभाग घेत असून वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाडे लावण्याचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.